महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक; 16 मे रोजी बीडमध्ये मोर्चा - मराठा आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता आरक्षणासाठी 16 मे रोजी बीडमध्ये पहिल्यांदा मराठा बांधव मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे.

Maratha community aggressive on reservation
Maratha community aggressive on reservation

By

Published : May 7, 2021, 2:00 AM IST

बीड - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता आरक्षणासाठी 16 मे रोजी बीडमध्ये पहिल्यांदा मराठा बांधव मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात बीडमध्ये बैठक झाली असून मोर्चा काढण्याबाबत ठरले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झाले. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details