नंदकुमार पाटील, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया बीडManoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. 15 नोव्हेंबरपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीड जिल्ह्यातील पेंडगावमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात धाराशिवमधील वाशी येथून होणार आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटलांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यापूर्वी त्यांनी बीडमधील तांदलवाडी गावात कीर्तन सप्ताहाची सुरवात केली. त्यानंतर जरांगे पाटील रामगडावर नतमस्तक झाले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. तसंच मराठा आंदोलकांशी संवाद साधला. दरम्यान, बीड हिंसाचार प्रकरणातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, ज्यांचा या प्रकरणात सहभाग नाही त्यांना अटक करू नये, अशी मागणीही जरांगे पाटील त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक :बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत ज्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत एकाही निरपराध व्यक्तीला अटक केलेली नाही. त्यांनी काही लोकांची नावे सांगितली आहेत. त्याबाबत पुन्हा चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असं पोलीस अधीक्षक नंदकुमार पाटील म्हणाले. तपास निःपक्षपणे सुरू आहे. त्यात दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येइल असं त्यांनी म्हटलंय.
सभेला विलंब होणार :मनोज जरांगे पाटील यांचं बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील पाली गावात बारा जेसीबीनं त्यांच्या अंगावर फुलं टाकून स्वागत करण्यात आलं. सकाळी अंतरवली सराटीतून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी जरांगे यांंचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे होणाऱ्या सभेला विलंब होत आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा आरक्षण, कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक
- Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारचं वाढवलं टेन्शन; जाहीर केला मोठा निर्णय
- Maratha Reservation : कुणबी समितीबाबत राज्य सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मागणी