बीड : 'ग्रामीण महिला व्यवसाय व उद्योजकता विकास' या संदर्भात दिला जाणारा २९ वा 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' या वर्षी बीड च्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संस्थापक सचिव श्रीमती मनिषा घुले यांना गुरूवारी प्रदान करण्यात आला. मुंबई येथील आयएमसी लेडीज विंगच्या कार्यालयात, प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड नायका च्या फाऊंडर व सीईओ श्रीमती फाल्गुनी नायर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मंचावर आयएमसी लेडीज विंग च्या अध्यक्षा श्रीमती रोमा सिंघानिया, राधिका नाथ, प्रमुख पाहुण्या फाल्गुनी नायर , आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी कनोडिया यांनी तर आभार उपाध्यक्षा अमरीता सोमय्या यांनी मानले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बजाज इलेक्ट्रिकचे मालक शेखर बजाज, निर्मल बजाज पूजा बजाज, सुश्री अनार शाह, श्रीमती ज्योती दोशी, डॉ.स्मिता दांडेकर, शिला कृपलानी, आशा जोशी, दीपा सोमण, दीपक सतावलेकर, मृणालिनी खेर, श्री प्रदीप शाह श्रीमती रूप शाह व सुश्री सोम्या रॉय आदींची विशेष उपस्थिती होती. विशेष म्हणजे पुरस्कार वितरण दरम्यान बजाज कुटुंबीय, प्रसिद्ध उद्योगपती समूहातील सहकारी, पदाधिकारी तसेच मान्यवर यांची उपस्थती होती.