महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयातच घेतले विष - बीड पोलीस बातमी

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला निवारण केंद्रात पत्नीस नांदविण्यास नकार देत विष प्राशन केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधितास उपचारासाठी तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात नेताना
रुग्णालयात नेताना

By

Published : Jan 4, 2021, 2:58 PM IST

Updated : Jan 4, 2021, 3:06 PM IST

बीड- बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात एका व्यक्तीने विष घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 4 जाने.) दुपारी घडला. पत्नीला नंदवण्यास घेऊन जाणार नाही, म्हणत इम्तियाज नावाच्या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलेले. विष घेतलेल्या त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बोलताना इम्तियाजची पत्नी
इम्तियाज आमेन कुरेशी (वय 30 वर्षे), असे विष घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई शहरातील रहिवासी असलेल्या इम्तियाज आमेन कुरेशी यांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. त्याना दोन अपत्य आहेत. 1 वर्षापूर्वी पती-पत्नीत वाद झाल्यापासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने 20 दिवसांपूर्वी पत्नीने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली होती. या तक्रारीवर आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात तिसरी तारीख होती. पत्नी नांदण्यास तयार असताना, तिला नांदवणार नाही म्हणत इम्जियाजने विष घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ उडाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्या पतीस बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Last Updated : Jan 4, 2021, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details