महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नात्याला काळिमा.. रात्री अंगणात झोपलेल्या वहिनीला फरफटत नेत दिराचा बलात्कार, केज येथील घटना - Kaij sister-in-law news

केज येथे चुलत दिरानेच भावजयीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा समोर आली आहे.

केज पोलीस ठाणे
केज पोलीस ठाणे

By

Published : May 31, 2021, 5:30 PM IST

Updated : Jun 1, 2021, 1:29 PM IST

बीड - जिल्ह्यातील केज येथे चुलत दिरानेच भावजयीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन केज ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराच्या बाजूला बळजबरीने फरफटत नेत तिच्यावर अत्याचार केला
नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील केज मध्ये समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मागील दीड महिन्यापूर्वी केज येथे राहत्या घरी विवाहित महिला सामोरील अंगणात झोपलेली होती. याच दरम्यान पीडित महिलेचा चुलत दिर (वय 25 वर्षे) याने घराच्या बाजूला बळजबरीने फरफटत नेत तिच्यावर अत्याचार केला होता व तिला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी व्हिडिओ शूटिंग नातेवाईकांना दाखवेल, अशी धमकी दिली. धमकीमुळे व आपल्या इज्जतीपोटी हा प्रकार पीडितेने तिच्या पतीला सांगितला नाही. परंतु पुन्हा 28 मे रोजी रात्री अकरा वाजता परत पीडितेवर चुलत दिराने अत्याचार केला. होणारा अत्याचार असह्य होत असल्याने पीडितेने घडला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला.

पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी
पीडित पत्नीने सांगितलेल्या प्रकारानंतर तिच्या पतीने दि. 29 मे रोजी सकाळी सात वाजता याबाबत चुलत भावास जाब विचारला असता त्याने (आरोपीने) पीडित महिलेचा पतीला शिवीगाळ केली आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेस दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपार पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Last Updated : Jun 1, 2021, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details