बीड - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचाच खून केल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे रविवारी घडली. आठवडाभरात बीड जिल्ह्यात झालेला हा पाचवा खून आहे.
धक्कादायक: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मोठया भावाकडून लहान भावाची हत्या - Beed police news
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गजानन काळे असे आरोपी नाव आहे. गजानन हा लहान भाऊ लक्ष्मण काळे वय 28 वर्षे याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करत होता. मात्र, लक्ष्मणने पैसे नसल्यामुळे गजाननला दारूसाठी पैसे दिले नाहीत.
सध्या लॉकडाऊन असल्याने व मजुरी मिळत नसल्याने पैसे नाहीत,असे लक्ष्मण याने मोठ्या भावाला स्पष्ट सांगितले. याचा राग मनात धरून रविवारी सकाळी धारदार शस्त्राने लक्ष्मण याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले.रक्तबंबाळ झालेल्या लक्ष्मण काळे याचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सदरील घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लक्ष्मणच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.