बीड- विद्युत प्रवाह संचारलेल्या लोखंडी शेडला हात लागल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची विदारक घटना गेवराई तालुक्यामधील तलवाडा येथे घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.
विजेचा झटका लागून तीस वर्षीय युवकाचा मृत्यू
गुरुवारी सायंकाळी सव्वा दहाच्या दरम्यान तलवाडा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या दरम्यान पत्र्चेया शेड असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये विद्युत प्रवाह संचारला. यावेळी शरद गोठ्याकडे गेले तेव्हा लोखंडी शेडला हात लावताच त्यांना विजेचा जबरदस्त झटका बसला
शरद रत्नाजी शिंगणे (वय 30 रा.तलवाडा ता गेवराई) असे मृत युवकाचे नाव आहे.
शरद यांचा तलवाडा येथील चौकात हाॅटेल व्यवसाय होता. त्यांचे घर शेतामध्ये आहे. गुरुवारी सायंकाळी सव्वा दहाच्या दरम्यान तलवाडा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या दरम्यान पत्र्याचे शेड असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये विद्युत प्रवाह संचारला. शरद जेव्हा गोठ्याकडे गेले तेव्हा लोखंडी शेडला हात लावताच त्यांना विजेचा जबरदस्त झटका बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई वडील असा परिवार आहे.