बीड -वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक भयंकर घटना जिल्ह्यातील गेवराई शहरांमधील अहिल्यानगर येथे घडली आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या भितीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरील व्यक्तीने आत्महत्या करण्यापुर्वी दोन्ही हातांच्या नसा ब्लेडने कापल्या होत्या. व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोरोनाच्या भीतीने एकाची आत्महत्या ; बीड जिल्ह्यातील घटना - beed suicide news
एका 38 वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या भितीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरील व्यक्तीने आत्महत्या करण्यापुर्वी दोन्ही हातांच्या नसा ब्लेडने कापल्या होत्या. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील रहिवासी असलेले व सध्या गेवराई शहरातील आहिल्या नगर येथे वास्तव्यास असलेले प्रकाश बाळकृष्ण गायकवाड ( वय 38 ) हे पुणे येथे नोकरीस होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे ते गेवराई शहरातील आहिल्यानगर येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी परत आले होते.
गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला होता. मात्र, मला कोरोनाची बाधा झाली आहे, असे म्हणून त्यांनी स्वत:ला एका खोलीमध्ये क्वारंटाईन करून घेतले. त्यांनी कोरोनाच्या भितीपोटी रविवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.