बीड- घरातील मंडळींचा विरोध झुगारून मुलासोबत लग्न केल्याच्या रागातून सासऱ्यानेच 25 वर्षीय सुनेचा खून केल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे गुरुवारी रात्री उशीरा ही खळबळजनक घटना घडली आहे. शीतल लव्हारे असे मृत सुनेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी सासरा बाळासाहेब लव्हारे याला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे.
अंबाजोगाईत कुऱ्हाडीचे घाव घालून सुनेची हत्या; सासरा गजाआड
मुलाच्या लग्नास बाळासाहेब याने विरोध केला होता. हे लग्न झाल्यानंतर अजय लव्हारे हा बाहेरगावी राहत होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तो घरी परतला. मात्र, या जोडप्याला पत्नीने घरात घेतल्याचा राग बाळासाहेबाच्या मनामध्ये होता. याच रागातून त्याने सुनेची हत्या केली असावी असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बाळासाहेब संभाजी लव्हारे याचा मुलगा अजय लव्हारे याचा शितल सोबत पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या लग्नास बाळासाहेब याने विरोध केला होता. हे लग्न झाल्यानंतर अजय लव्हारे हा बाहेरगावी राहत होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तो घरी परतला. मात्र, या जोडप्याला पत्नीने घरात घेतल्याचा राग बाळासाहेबाच्या मनामध्ये होता. याच रागातून त्याने सुनेची हत्या केली असावी असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शितल लव्हारे या विवाहितेच्या गळ्यावर सासरा बाळासाहेब लव्हारे याने कूर्हाडीचे घाव घातले. त्यावेळी सुनेला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीला देखील बाळासाहेब याने मारहाण केली. यामध्ये त्या देखील जखमी झाल्या आहेत. या घटनेत शीतला जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. ही घटना घडल्यानंतर सासरा फरार झाला होता. मात्र शुक्रवारी पहाटे सासर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.