महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन : सोशल डिस्टन्सिंग पाळून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं ध्वजारोहण - maharashtra day celebration

कोरोना पार्श्वभूमिवर सोशल डिस्टन्सिंग पाळून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची उपस्थिती होती.

maharashtra day celebration : Flag hoisting by the Guardian Minister dhananjay munde in beed
महाराष्ट्र दिन : सोशल डिस्टन्सिंग पाळून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं ध्वजारोहण

By

Published : May 1, 2020, 12:46 PM IST

बीड- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करुन, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आज साधेपणाने साजरा केला जात आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १ मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये स्थापन करण्यात आले. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

बीड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन साजरा...

आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बीड पोलीस दलातील पदक विजेत्या, तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पदकं प्रदान करण्यात आली. याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी जिल्हावाशियांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा -पोलीस दलातील बायकोला मुंबईत सोडून येताना बहिणीला आणले, गुन्हा दाखल

हेही वाचा -"त्या दोन महिन्यात जे शिकलो ते आयुष्यभरात शिकलो नसतो", कोटा येथून परतलेल्या विद्यार्थ्याची आपबिती

ABOUT THE AUTHOR

...view details