अक्षय पोकळे - जिल्ह्यतील आष्टी- पाटोदा- शिरुर हा मतदारसंघ बीडमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ मानला जातो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 2 लाख 50 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे भीमराव धोंडे 48.30 टक्के मतं घेऊन विजयी झाले, तर तेव्हाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनीही कडवी झुंज देत 45.90 टक्के मतं घेतली होती. त्यावेळी धोंडे फक्त 5 हजार 982 मतांच्या फरकाने जिंकले होते. पण, यावेळी सुरेश धसही भाजपमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - अखेर युतीच गणित ठरलं! शिवसेनेला भाजपचा प्रस्ताव मान्य
आष्टी मतदारसंघात तिकीटासाठी होणार रस्सीखेच -
या मतदारसंघात तीनवेळा राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेल सुरेश धस भाजपमध्ये आले असून ते सध्या भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. तसेच येथे भाजपकडून भीमराव धोंडे हे 2014 च्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे यावेळी येथे भाजपची तिकीटावरुन चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे.
राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे की...??
दुसरीकडे राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे व युवानेते सतिश शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीने बीडमधील आष्टी वगळता सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आष्टी मतदारसंघाबाबत मात्र राष्ट्रवादीने अजूनही ससपेंस कायम ठेवला आहे. त्यामुळे तर्क-विर्तकांना उधाण आले असून कदाचित ही जागा काँग्रेसला सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - 'श्वास चाले पर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'
जयदत्त धस विधानसभेच्या रिंगणात?
सुरेश धस यांचे चिरंजीव व युवानेते जयदत्त धस हे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच जयदत्त धस यांचे तरुण कार्यकर्तेही 'भावी आमदार जयदत्त धस' या नावाने हॅशटॅग वापरून सोशल मीडिवावर त्यांचे फोटोज व त्यांनी मतदारसंघात घेतलेल्या गाठीभेटींचा आढावा शेअर करत आहेत. त्यामुळेही त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना अजूनच जोर आला आहे. तसे पाहता जयदत्त धस मतदारसंघात पूर्वीपासूनच सक्रिय आहेत. त्यांना माननारा मोठा तरुण वर्ग या मतदारसंघासह बीड जिल्ह्यात आहे.
हेही वाचा - नाशिक दौऱ्यात मोदींनी युतीचा ‘य’ सुद्धा उच्चारला नाही- अमोल कोल्हे
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा असेल, असे सुरेश धस यांनी सांगितले होते. त्या जो कोणी उमेदवार येथे देतील त्यांना आम्ही मदत करणार असल्याचेही धस यांनी सांगितले. त्यामुळे भाजप येथे विद्यामान आमदार भीमराव धोंडे यांना तिकीट देणार की, नवीन व तरुण चेहऱयाला संधी म्हणून जयदत्त धस यांना तिकीट देणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
सुरेश धस भाजपच्या कळपात -