महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपमध्ये पक्षांतर्गत वाद; बीडमध्ये विधानसभा उमेदवारीवरून धोंडे विरूद्ध धस संघर्ष - पाटोदा-आष्टी विधानसभा मतदारसंघ

२०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभूत केले होते. त्यानंतर धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटोदा- आष्टी मतदारसंघावर धोंडे यांनी दावा केला आहे तर धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे.

भीमराव धोंडे, सुरेश धस

By

Published : Sep 14, 2019, 5:46 PM IST

बीड -२०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभूत केले होते. त्यानंतर धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटोदा- आष्टी मतदारसंघावर धोंडे यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गतच वाद उफाळून आल्याने आता पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - पाकिस्तानला युद्ध नको असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा - आठवले

जयदत्त धस हे पाटोदा-आष्टी विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरत आहेत. याही पलीकडे जाऊन जयदत्त धस यांचे कार्यकर्ते भावी आमदार म्हणून समाज माध्यमावर उल्लेख करत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे आष्टी विधानसभा मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना मिळणार की, विधानपरिषदेवर निवडूण आलेले सुरेश धस यांना मिळणार, याची जोरदार चर्चा चालू आहे. मात्र, धोंडे यांनी पक्षश्रेष्ठींची भेट धेतली व आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उमेदवारी मलाच मिळणार आहे. त्यामुळे कामाला लागा, असा असा विश्वास दाखत धोंडे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

हेही वाचा - 'फाळणी' ही आधुनिक भारतातील सर्वांत मोठी चूक - जितेंद्र सिंह

हेही वाचा - अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details