महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये काकाला तर परळीत बहिणीला पराभवाचा धक्का! - बीड जिल्हा विधानसभा निकाल

बीड जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदार संघातील क्षीरसागर काका-पुतणे व परळी विधानसभा मतदार संघातील मुंडे बहीण भाऊ यांच्या लढती लक्षवेधी होत्या.

बीड जिल्हा विधानसभा निकाल

By

Published : Oct 25, 2019, 10:47 AM IST

बीड -जिल्ह्यातील बीड व परळी विधानसभा मतदारसंघातील विधानसभेचे निकाल धक्कादायक लागले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात पुतण्या संदीप क्षीरसागर ( राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी काका तथा शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला, तर परळी विधानसभा मतदारसंघात भाऊ धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी बहीण पंकजा मुंडे (भाजप) यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे परळीत हादरा दिला आहे. जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदार संघातील क्षीरसागर काका-पुतणे व परळी विधानसभा मतदार संघातील मुंडे बहिण भाऊ यांच्या लढती लक्षवेधी होत्या.

परळी विधानसभा मतदार संघ

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा 30 हजार 768 मतांनी पराभव केला आहे. धनंजय मुंडे यांना 1 लाख 21 हजार 186 मते पडली. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 90418 एवढी मते पडली. धनंजय मुंडे यांच्या स्टेट फॉरवर्ड स्वभाव तर पंकजा मुंडे यांचा एटीट्यूड यामुळे याचा परळी भाजपला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातून धनंजय मुंडे प्लस ठरले एवढेच नाही तर परळी शहरातून धनंजय मुंडे यांना 15000 पेक्षा अधिक मतांची लीड मिळाली आहे. मागील पाच वर्षात धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम केलेल्या कामामुळे परळीच्या जनतेने धनंजय मुंडे यांना स्वीकारले. याशिवाय त्यांचा जनतेशी असलेला थेट जनसंपर्क याचा परिणाम पंकजा मुंडे यांना जनतेने नाकारले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघात यावेळी कसलीही भावनिकतेची लाट चालली नाही.

हेही वाचा... शहरी मतदारांनी 'सेना-भाजप'ला तारले?

बीड विधानसभा मतदारसंघ

बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यात अटीतटीची लढत झाली. पहिल्या फेरीपासूनच मतांची लीड मागेपुढे होत राहिली. बीड शहरात संदीप क्षीरसागर यांना चांगली मते मिळाली. बीड नगरपालिकेवर जयदत्त क्षीरसागर यांचे छोटे बंधू डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता असताना देखील बीड शहरमधून जयदत्त क्षीरसागर मायनस राहिले. बीड शहरातील खराब रस्ते यामुळे बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना मतांचा कौल मिळाला नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांनी 1786 मतांनी शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.

केज विधानसभा मतदार संघ

केज विधानसभा मतदार संघात भाजपच्या नमिता मुंदडा या ते 30 हजार 96 मताधिक्क्याने विजयी झाल्या. पक्षांतर करून देखील मुंदडा कुटुंबीयांना केजच्या जनतेने स्वीकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विरुद्ध नमिता मुंदडा यांनी 1 लाख 22 हजार 736 मते घेतली. पृथ्वीराज साठे यांची तोडकी प्रचार यंत्रणा असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यास ते अपयशी ठरले. यामुळे त्यांचा पराभव झाला. दिवंगत विमल मुंदडा यांच्यानंतर पुन्हा एकदा केज विधानसभा मतदार संघात मुंदडा पर्व नमिता मुंदडा यांच्या रूपाने सुरू झाले आहे.

हेही वाचा... मनसेचं आता काय होणार?

माजलगाव विधानसभा मतदारसंघ

माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके हे 12 हजार मतांनी विजयी झाले. प्रकाश सोळंके यांच्या विरोधात उभा असलेले रमेश आडसकर केज विधानसभा मतदारसंघातले रहिवाशी आहेत. मात्र, त्यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. अर्थातच माजलगावच्या स्थानिक उमेदवाराला भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे जनतेने स्थानिक उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांच्या पारड्यात मते टाकली. प्रकाश सोळंके यांना 1 लाख 11 हजार 566 मते पडली तर भाजपचे रमेश आडसकर यांना 98 हजार 676 मते पडली.

गेवराई विधानसभा मतदारसंघ

गेवराई विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपचे लक्ष्मण पवार 6901 मतांनी विजयी झाले. तिरंगी लढत असल्याने मोठ्या प्रमाणात मते विभागली गेली याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना बसला गेवराई विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण पवार यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने गेवराईच्या जनतेने पुन्हा एकदा पवार यांना स्वीकारले शांत व संयमी राजकारण असल्याचा लाभ पवार यांना झाला आहे. युती असतानाही शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये बदामराव पंडित हे तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

आष्टी विधानसभा मतदारसंघ

आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे 25 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे भीमराव धोंडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे यांना 1 लाख 26 हजार 756 मते पडली. तर भीमराव धोंडे यांना 1 लाख 931 तेवढे मते पडली. आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार भीमराव धोंडे यांच्या पराभवाला अंतर्गत गटबाजी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भीमराव धोंडे यांच्यावर नाराज होते.

ABOUT THE AUTHOR

...view details