महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Papaneshwar Temple : भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे पापनेश्वर मंदिर; जाणून घ्या आख्यायिका - The wishes of the devotees are fulfilled

पापनेश्वराचे मंदिर पावन मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यामध्ये पापनेश्वराचे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महिनाभर या ठिकाणी लोक पाणी घालण्यासाठी येतात, तिसऱ्या सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मंदिर म्हणुन या मंदिराला ओळखले जाते.

Papaneshwar Temple
Papaneshwar Temple

By

Published : Apr 9, 2023, 8:33 PM IST

Updated : Apr 11, 2023, 8:17 AM IST

भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे पापनेश्वर मंदिर

बीड : पापनेश्वर मंदिर हे 400 ते 500 वर्षांपूर्वीच मंदिर असून या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे. विशेष म्हणजे या महादेवाला पावणारा पापनेश्वर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर पापाचा नाश करणारा पापनेश्वर मंदिर म्हणुनही या मंदिराची ओळख आहे. या ठिकाणी भक्तांच्या मनोकामान पुर्ण होतात अशी अख्यायीका आहे.

भक्तांच्या इच्छा पुर्ण : शिवशंकर भोलेनाथ ज्याप्रमाणे एकांतात असतात त्याप्रमाणेच या पापनेश्वराचं मंदिराच्या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण आहे. इतर दिवसही या ठीकाणी भाविकांची गर्दी असतेच मात्र, श्रावणी सोमवारला तर प्रत्येक सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली असते. पापनेश्वराने अनेक भक्तांना दर्शन दिलेले आहे. आज महत्त्वाचा सोमवार आहे. या ठिकाणी 16 सोमवाराचे वृत्त करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात येऊन पूजा आज करतात. महादेवाच्या पिंडीला पांढऱ्या शुभ्र भाताचा लेप दिल्या जाते. टायवेल, टोपी, फुल, नारळ, बेल वाहून पूजा केली जाते. भक्तांनी देवाकडे मागितलेली इच्छा पूर्ण करण्याचे काम पापनेश्वराचे मंदिर करते असे येथील भक्तांनी सांगितले आहे.

पिंडीला भाताचे लेपन : पापनेश्वराचे मंदिर पावन मंदिर म्हणून या परिसरात ओळखले जाते. भक्तांना पापनेश्वर पावलेले आहेत, श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते महिनाभर या ठिकाणी लोक पाणी घालण्यासाठी येतात, तिसऱ्या सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. सोमवारी प्रदोष पूजा असेल त्या दिवशी महादेवाच्या पिंडीला भाताचे लेपन केले जाते, आज सोमवार प्रदोष असल्यामुळे भात लेपण पूजा केलेली आहे असे इथल्या पुजाऱ्यांने सांगितले आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार :या मंदिराचा इतिहास नेमका किती वर्षांपूर्वीचा आहे. कुणालाही सांगता येत नाही. सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वीच हे मंदिर असल्याचे इथल्या स्थांनिक रहिवाशांचे म्हणणे आहे. हे मंदिर पूर्वी दगडाचे मंदिर होते. या ठिकाणी जुना दगडाचा सभा मंडप होता. मात्र, तो खराब झाल्यामुळे तो वाढून नवीन सभामंडप करून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सर्वांनी सामाजिक बांधिलकीमधून या मंदिराचे काम केलेले आहे. त्या मंदिराला काही लोकांनी भरपूर जमीन दान केलेली होती. मात्र, ती जमीन आता राहिलेली नाही. थोडीफार जमीन आता शिल्लक आहे. या मंदिराच्या समोर दगडी मंडप होता त्या ठिकाणी आम्ही खोदण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जसे जसे खोल जावे तसे तसे त्यामध्ये मोठमोठे दगड निघत गेले, असे मुकुंद सखाराम मुळेकर यांनी सांगितले. श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी आपोआप या मंदिरामध्ये पाणी येते. हे पाणी शंभू महादेवाच्या पिंडीला पूर्ण वेढा घालते. नंतर ते पाणी पुन्हा आपोआप कमी होते. त्यामुळे ही मंदिर अत्यंत पुरातन काळातील आहे. कोणताही हिंदूचा उत्सव असला की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात अशी मुकुंद सखाराम मुळेकर यांनी दिली आहे.

पापाचा नाश करणारा ईश्वर :मंदिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मंदिराच्या बाजूला बारव आहे. त्या बारवाचे पाणी महादेवाच्या पिंडीपर्यंत येत. या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला आहे. हे मंदिर हेमाडपंथी मंदिर असुन, बाजूला एक कुंड आहे. त्याला सीता कुंड असे म्हटले जाते. या ठिकाणी रामाने बाण मारल्यामुळे या ठिकाणी पाणी निघालेले आहे असे अख्यायीका आहे. हे पाणी कधीही आटत नाही, यांच्या नावातच पापनेश्वर नाव आहे. म्हणजे पापाचा नाश करणारा ईश्वर म्हणून पापनेश्वराला ओळखले जाते अशी माहिती शिवकुमार नांगरे या भक्ताने व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Ravikant Tupkar : 'राज्यातील शेतकरी वाऱ्यावर अन् राज्य सरकार अयोध्या दौऱ्यावर'

Last Updated : Apr 11, 2023, 8:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details