महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस गळती झाल्याने घराला आग, सासू-सुनेसह मुलगी जखमी - Sangavi LPG cylinder leak news

केज तालुक्यातील सोने सांगवी येथे एका घरातील गॅस लिकेज झाल्याने घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे

सांगवी आग न्यूज
गॅस गळती झाल्याने घराला आग, सासू सुनासह मुलगी जखमी

By

Published : May 29, 2021, 3:47 PM IST

बीड - केज तालुक्यातील सोने सांगवी येथे एका घरातील गॅस लिकेज झाल्याने घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. यात सासू, सुनेसह एक मुलगी जखमी झाली आहे.

सिलेंडरमधून गॅस गळती होऊन घेतला पेट
सोने सांगवी येथे आज (दि. 29) शनिवार रोजी सकाळी अंदाजे दहा ते अकराच्या दरम्यान विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन पेट घेतला. सदरील प्रकार घडल्याने घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सूनेेने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. तर यामध्ये त्या दोघींसह एक मुलगी जखमी झालेे. तिघीनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सदरील प्रकार नेमका कसा घडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सदरील घटनेत नगदी रकमेसह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून संबंधित तलाठी व मंडळधिकारी हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details