बीड - जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावच्या अशोक आघाव यांच्या शेतात असलेल्या कुकुटपालनाच्या शेडवर वीज पडून तब्बल एक हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आघाव यांनी केली आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावाच्या अशोक आघाव यांच्या शेतात असलेल्या कुकुटपालनाच्या शेडवर गुरुवारी वीज पडून तब्बल एक हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशोक आघाव यांच्या मेलेल्या कोंबड्यांचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी समोर येत आहे.
बीड : वीज पडून एक हजार कोंबड्यांचा मृत्यू - बीडमध्ये वीज कोसळून कोंबड्याचा मृत्यू न्यूज
शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावच्या अशोक आघाव यांच्या शेतात असलेल्या कुकुटपालनाच्या शेडवर वीज पडून तब्बल एक हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
परतीच्या पावसाने पिकाचे तर नुकसान झालेलेच आहे. मात्र आता शेतीला जोड व्यवसाय करणारे शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी प्रत्यक्षात फिल्डवर उतरलेले नसल्याचे वास्तव बीड जिल्ह्यात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. अशोक आघाव यांच्याकडील एक हजार कोंबड्या क्षणार्धात मृत पावल्याने चार लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितलं.