बीड - बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेवराई तालुक्यातील माळस, पिंपळा व राक्षसभुवन शिवारात एका बिबट्याने गाईच्या वासराला भक्ष्य करत ठार केलं. मात्र, त्यांनतर बिबट्याचाही मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
वासराला खाल्लेल्या बिबट्याचा आढळला मृतदेह; बीड मधील गेवराई तालुक्यातील घटना
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शेतकरी सुरेश लक्ष्मण नाटकर हे आपली जनावरे घेऊन शिवारात चारण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या गाईचं वासरू अज्ञात हिंस्र पशूने खाल्ल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. मात्र त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आज बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शेतकरी सुरेश लक्ष्मण नाटकर हे आपली जनावरे घेऊन शिवारात चारण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या गाईचं वासरू अज्ञात हिंस्र पशूने खाल्ल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. मात्र त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आज बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. घटनास्थळावर गेवराई पोलिसांसह स्थानिक तलाठी आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करत आहेत. मृत्यू पावलेल्या बिबट्याचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.