महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याचा आणखी एक हल्ला, उदंड वडगाव शिवारातील घटना - leopard attacked buffalo news

बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या म्हशीवर बिबट्याने बुधवारी पहाटे हल्ला केला. परंतु, बंकट स्वामी नगरवासियांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 2, 2020, 4:47 PM IST

Updated : Dec 2, 2020, 5:00 PM IST

बीड- मागील आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने थैमान घालत तिघांचा बळी घेतला आहे. आष्टी पाठोपाठ बीड तालुक्यातील उदंडवडगाव शिवारात एका म्हशीवर (वगार) बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील सुदाम चव्हाण यांच्या म्हशीवर बिबट्याने बुधवारी पहाटे हल्ला केला. परंतु, बंकट स्वामी नगरवासियांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गावाच्या शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याचे ते सांगतात. उदंड वडगाव शिवारात बंकट स्वामी नगर वस्तीवर सुदाम दशरथ चव्हाण हे आपल्या कोट्यासमोर म्हशींना बांधून ओट्यावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वगारीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्लाने जनावरांनी एकच ओरड सुरू केली. त्यामुळे सुदाम चव्हाण जागे झाले आणि त्यानी आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीवरील लोक जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून बिबट्याने वगारीला सोडून पूर्वेला नदीच्या दिशेने पळ काढला. बुधवारी सकाळीही काही ग्रामस्थांना बिबट्या दिसला.

शेतांमध्ये आढळले बिबट्याचे ठसे

बिबट्याच्या पायाचे ठसे

पाणी दिलेल्या अनेक शेतांत बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळी सरपंच राजेश पांचाळ, तलाठी राऊत, ग्रामसेवक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. वनविभागाला याची कल्पना दिली आहे, असे राजेश पंचाळ यांनी सांगितले. वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा मोठा अनर्थ घडण्याआधी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ शंकर चव्हाण यांनी केली आहे.

Last Updated : Dec 2, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details