बीड -बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक कोरोनाबाधित सध्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून माँ वैष्णोदेवी पॅलेस येथे 200 खाटांचे सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे वैशिष्ट म्हणजे हे कोविड सेंटर ना नफा ना तोटा तत्त्वावर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
बीड जिल्ह्यात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. नेमका कोणाला फोन करायचा व कोणाची मदत घ्यायची असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये संतोष सोहनी यांनी आपल्या मालकीच्या मंगल कार्यालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर दोनशे बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.
कोविड सेंटरमध्ये 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या कोवीड सेंटरमध्ये दोन एमडी, चार एमबीबीएस डॉक्टर व वीस नर्स अशा एकूण 26 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा पुरवण्या येत असून, त्यांच्या जेवणाची देखील विशेष काळजी घेण्यात येत आहे. या रुग्णांना दोन वेळा पोस्टीक आहार, फळे, चहा, आयुर्वेदिक काढा देण्यात येतो.
'सेवाभावातून कोविड सेंटरची सुरुवात'