महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vidyan Ganesh Mandir: बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे पुरातन विज्ञान गणेश; काय आहे या विज्ञान गणेशाची ख्याती? - काय आहे विज्ञान गणेश

भारतामध्ये गणपतीचे एकूण 21 पिठ आहेत. त्यापैकी 9 वे पीठ म्हणून विज्ञान गणेश हे एक पीठ म्हणून ओळखले जाते. हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन या ठिकाणी आहे. येथे विज्ञान गणेशाची श्री दत्तात्रय प्रभू यांनी घोर अनुष्ठान करून प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. उजव्या सोंडेचा गणपती व नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. या विज्ञान गणेशाची आख्यायिका जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट वाचा.

Vidyan Ganesh Mandir
पुरातन विज्ञान गणेश

By

Published : Feb 28, 2023, 8:22 AM IST

प्रतिक्रिया देताना भाविक व पुजारी

बीड :विज्ञान गणेश हे एक पुरातन मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. या देवस्थानाला शंभर एकर जमिनी दान दिलेल्या आहेत, या गणपतीला आर्थिक मदत कुठूनही दिली जात किंवा येत नाही. गणेश जन्मोत्सवाला फार मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. प्रत्येक महिन्याच्या गणेश चतुर्थीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काळामध्ये विज्ञानाच्या आधारावर विज्ञान गणेश मंदिर म्हणून स्थापन केलेले आहे. पुरातन काळापासून हे मंदिर विज्ञान गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.


काय आहे विज्ञान गणेश ?विज्ञान गणेश हे नाव ऐकल्यानंतर व हा विज्ञान गणेश राक्षस भवन या गावामध्ये आहे, हे ऐकल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटते. विज्ञान गणेश हे अतिशय पौराणिक तीर्थक्षेत्र आहे. भारतामध्ये असलेल्या 21 पिठांपैकी 9 वे पीठ म्हणून विज्ञान गणेशाला ओळखले जाते, जसे अष्टविनायक आहेत तसे देशामध्ये 21 पीठ या भारतामध्ये आहेत. याला पौराणिक आधार आहे, म्हणून याला पीठ समजले जाते. जे 21 पीठ आहेत त्या महत्त्वाच्या पिठांपैकी हे एक नवसाला पावणारे गणपती म्हणून या विज्ञान गणपतीकडे पाहतात. पूर्वी 1700 शेच्या काळामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. तेव्हापासून आम्ही या ठिकाणी पुजारी म्हणून काम पाहत आहोत, त्याची पूजा करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे पुजाऱ्याने सांगितले.



काय आहे या मागची आख्यायिका ?त्रेता युगामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना साडेसाती लागली होती, त्यावेळेस प्रभू रामचंद्र या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांनी नवग्रहांची स्थापना केली. त्यामुळे राक्षसभुवन हे गाव अतिशय प्रसिद्ध झाले. याच गावामध्ये विज्ञान गणेश प्रभू दत्तात्रेय यांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. ही मूर्ती स्वयंभु आहे, उजव्या सोंडेची मूर्ती आहे. अत्री आणि अनुसया यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. गोदावरी वाहत होती. या ठिकाणी घनदाट जंगल होते.

सात्विक पतिव्रता :या दंडकारण्यामध्ये अत्री आणि अनुसया या अनुष्ठान करायचे. त्याच काळामध्ये ब्रम्हांश आणि रुद्र यांच्या पत्नीला जेव्हा गर्व झाला. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ पतिव्रता पृथ्वीतलावर व तिन्ही लोकांमध्ये कोणीही नाही, त्यावेळेस नारदांनी त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी राक्षसभुवन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अत्री आणि अनुसया असे दोन दाम्पत्य आहेत. अनुसया ह्या पतिव्रता आहेत, त्या सात्विक पतिव्रता आहेत. हे ऐकून ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या पत्नीला वाटले की, आपणही जग चालवणाऱ्या च्या पत्नी आहोत, आणि आपल्यापेक्षाही श्रेष्ठ पत्नी या भूतलावर आहे. त्यांनी आपल्या पतीला आज्ञा केली की, तुम्ही राक्षसभुवन या तीर्थक्षेत्रावर जा आणि अनुसयांचे पतिव्रता वृत असल्याचे हरण करा, हे ऐकल्यानंतर ब्रह्म विष्णू आणि महेश यांना पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी थेट राक्षसभुवन या ठिकाणी आले.

पतिव्रतेचा गुणधर्म : साधूंचे रूप घेतले आणि या ठिकाणी आले. 'ओम भवती भिक्षांदी...' शब्दाचा गजर केला. गजर केलेला पाहून अनुसया यांनी या साधुंना आपल्या घरामध्ये जे असेल ते देण्यासाठी त्या पुढे आल्या. भिक्षा वाढण्यासाठी त्यांनी त्यांचे सूप समोर केलं, आणि त्यांनी ही ओळखले की ही पतिव्रता स्री आहे. आपण या स्त्रीची परीक्षा पाहण्यासाठी आलेलो आहोत. पत्नीचा हट्ट आहे की, या अनुसया मातेचे पतिव्रता व्रत हरण करायचे आहे, मग ब्रह्म आणि विष्णू महेश यांनी सांगितले की, आम्ही आपण दिलेली भिक्षा आम्ही घेऊ मात्र आमची एक अट आहे. पतिव्रता स्रीचे एक वैशिष्ट्य असते की, आपल्या घरामध्ये जे धनधान्य असेल ते, जे साधू असतील किंवा अतिथी असतील त्यांना जेवन द्यायचे व त्यांचे समाधान करायचे हा पतिव्रतेचा गुणधर्म आहे.

लहान मुलांच्या स्वरूपात आले :तुम्ही ही भिक्षा आम्हाला नग्न अवस्थेमध्ये येऊन वाढायची आहे मग अनुसया मातेला प्रश्न पडला की, अनुसयांनी आपल्या पतीकडे गेली. सांगितले की, अशी अशी मंडळी दारात आलेली आहे. ती अशी भिक्षा मागत आहे. मी जर यांना भिक्षा वाढली नाही, तर माझ्या पतिव्रतेचे व्रत हरण होईल. परपुरुषासमोर जर मी नग्न अवस्थेत गेली तर माझेही पतीवृत्तेच हरण होईल, मग पतीने आज्ञा केली. पती अत्री ऋषी हे तर एक थोर साधू होते, दिव्य दृष्टीने पाहिले तर हे तर ब्रह्म विष्णू आणि महेश आहेत. मग अनुसयाला सांगितले की, काळजी करू नको. ही मंडळी काही साधीसुधी मंडळी नाही, हा देवांचा अवतार आहे. अनुसयाला अत्रि ऋषींनी आदेश दिला की. तुझा आणि कमंडलु मधले पाणी घे आणि त्यांच्या अंगावर शिंपड. त्या वेळेस अनुसया माता यांनी पतीला नमस्कार केला. भिक्षा वाढण्यासाठी या साधूंकडे आली. त्यांच्या अंगावर पाणी शिंपडले आणि ते छोटे छोटे बालक झाले. ते छोटे बालक झाल्यानंतर ते लहान मुलांच्या स्वरूपात आले होते.

हा नेमका प्रकार कसा घडला? तेअनुसया मातेचे पुत्र झाले. नग्न अवस्थेमध्ये पुत्राला पाहणे म्हणजे काही पतिव्रतेचा भंग होत नाही, अत्रे ऋषींनी आज्ञा केली होती. तसेच झाले, पण ही बालके झाल्यानंतर काही दिवस झाले. त्यांच्या पत्नींना प्रश्न पडला की आमचे पती कुठे आहेत, विश्वाचे चालक ब्रह्म विष्णू आणि महेश हे कुठे आहेत त्यांना प्रश्न पडला होता. त्यांनी नारदाला आज्ञा केली की, आमचे पती कुठे आहेत ते पहा. नारदाने सांगितले की ते आता येऊ शकत नाहीत ते आता छोटे छोटे बालक झालेले आहेत, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जाताल आणि तुमचे गर्वहरण होईल त्यावेळेसच तुमचे पती तुम्हाला मिळतील. नारदाने त्यांना सांगितले की, तुम्ही राक्षसभुवन अत्यंत क्षेत्रावर जा. तुमचे पती त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यानंतर ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी राक्षसभुवन या तीर्थक्षेत्रावर आल्या. त्यांनी पाहिले तर त्यांचे पती हे लहान, लहान बालक झालेले होते. हे पाहून त्यांना अचंबित झाल्या. त्यानंतर हा नेमका प्रकार कसा घडला? हे त्यांनी अनुसया मातेला विचारले. त्यांनी सांगितले की, माझे पतिव्रता व्रत हरण करण्यासाठी तुम्ही या तिघांना पाठवले होते, मात्र मीच त्यांना हरण करून ठेवलेले आहे.

नवसाला पावणाऱ्या गणेशाची स्थापना : त्यावेळेस ब्रह्म विष्णू महेश आणि यांच्या पत्नीने अनुसया मातेची माफी मागितली, जे मूळ अंश काढून घेतले आणि ते म्हणजे दत्तात्रेय चंद्रात्रे, ध्रुवात्रेय. दत्तात्रेय,चंद्रात्रे ध्रुवात्रेय मूळ स्वरूप त्यांच्या पत्नीला देऊन टाकले. त्यांची जी लहान लहान बालके होती ती तशीच ठेवले, लहानाचे मोठे होत गेले आणि, ध्रुवात्रेय आणि चंद्रात्रे यांचे मन रमले नाही आणि ते आपल्या आई वडिलांची आज्ञा घेतली आणि हिमालयात निघून गेले. दत्तात्रय यांनी या ठिकाणी घोर अनुष्ठान केले. 'ज्ञान मयो विज्ञान मयोशी' विज्ञान योगामध्ये ज्ञान प्राप्त करणाऱ्या नवसाला पावणाऱ्या गणेशाची स्थापना केली. तो गणेश म्हणजे विज्ञान गणेश होय. अथर्व शिर्शामध्ये एक श्लोक आहे, तो म्हणजे विज्ञान ज्ञान मयो विज्ञान मयोशी. विज्ञान गणेशाचे नामस्मरण केले, तर हा नवसाला लवकर पावणारा गणेश आहे, म्हणून याला विज्ञान गणेश असेही म्हणतात. दत्तप्रभूंनी मोठी साधना करून या गणेशाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे.


हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details