बीड- तालुक्यातील केळगाव शिवरात पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका संस्था चालकाचे अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेत संस्थाचालकाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीसाठी संस्था चालकाचे अपहरण; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
२ दिवस खंडेरावांना कापसाच्या शेतात हात-पाय बांधून ठेवण्यात आले होते. तिथून दुसरीकडे घेऊन जात असताना वाटेत लघुशंकेसाठी उतरल्यास अंधाराचा फायदा घेत खंडेरावांनी तिथून पळ काढला. त्यानंतर चुलत भावाला बोलवून थेट केज पोलीस ठाणे गाठले.
२५ लाख रुपये खंडणीची मागणी-
केज तालुक्यातील बेलगाव येथील संस्था चालक खंडेराव रघुनाथ चौरे ( वय ४६ ) हे ३० डिसेंबर रोजी बेलगावकडे येत असताना केळगाव शिवारातील एका विहिरीजवळ त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर पांढऱ्या जीपमध्ये जबरदस्ती बसवत त्यांचे अपहरण करण्यात आले. काही वेळानंतर प्रताप नरसिंग दातार आणि संग्राम नरसिंग दातार या दोघा भावांनी फोन करुन २५ लाख रुपयांची मागणी केली. आणि पैसे नाही दिल्यास तिकडेच मारुन टाका असा आदेश अपहरकर्त्यांना देण्यात आला. २ दिवस खंडेरावांना कापसाच्या शेतात हात-पाय बांधून ठेवण्यात आले होते. तिथून दुसरीकडे घेऊन जात असताना वाटेत लघुशंकेसाठी उतरल्यास अंधाराचा फायदा घेत खंडेरावांनी तिथून पळ काढला. त्यानंतर चुलत भावाला बोलवून थेट केज पोलीस ठाणे गाठले. खंडेराव चौरे यांच्या फिर्यादीवरून प्रताप दातार, संग्राम दातार, नरसिंग दातार ( सर्व रा. बेलगाव ) व इतर तीन इसमाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.