आष्टी(बीड) - "पलटी होते गाडी कधी बैल जातो मरून, मुकादमाच्या बोजाखाली श्वास जातो गुदमरून, ना अपघाताची हमी कुठली, ना पॉलिसीचे कव्हर, बाईपणाच्या जगण्याला कधीच नाही बहर, ऊसतोड मजूरावर कवी इंद्रकुमार झांजे यांनी कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. ऊसतोड कामगार सध्या कसे जिवन जगतात याचे प्रतिबिंबचं या कवितेतून त्यांनी सादर केले. आष्टी येथे आमदार सुरेश धस यांच्या जन्मदिन औचित्य साधून सुरेश धस मिञमंडळाच्यावतीने अव्दैतचंद्र निवासस्थानी रविवारी राञी आठ वाजता राज्यातील निमंत्रित कविंचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष खोडा व बबन चिञपटाचें गीतकार विनायक पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत प्रतिष्ठान सोनईचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे होते. या कविसंमेलनात राज्यातील डी.के.शेख, प्रभाकर साळेगांवकर, मुकूंद राजपंखे, अनंत कराड, अरूण पवार, सत्यप्रेम लगड, सुरेखा खेडकर, विठ्ठल जाधव, माधव सांवत, नागेश शेलार, संगिता होळकर व इंद्रजीत झांजे या कवींनी सहभाग घेतला होता.