बीड- भाजपच्या झंजावाती नेत्या म्हणून सुषमा स्वराज ओळखल्या जात होत्या. लोकसभेत त्यांचे कार्य उल्लेखनीय होते त्यांच्या निधनाने देश एका महिला नेतृत्वाला मुकला आहे. इंदिरा गांधी नंतर दुसऱ्या महिला परराष्ट्रमंत्री म्हणून त्या एकमेव होत्या. अशी प्रतिक्रिया रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शोकसंदेशात दिली आहे.
परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचे कार्य उल्लेखनीय - मंत्री जयदत्त क्षीरसागर - सुषमा स्वराज बातमी
भाजपच्या झंजावाती नेत्या म्हणून सुषमा स्वराज ओळखल्या जात होत्या. लोकसभेत त्यांचे कार्य उल्लेखनीय होते त्यांच्या निधनाने देश एका महिला नेतृत्वाला मुकला आहे. इंदिरा गांधी नंतर दुसऱ्या महिला परराष्ट्रमंत्री म्हणून त्या एकमेव होत्या. अशी प्रतिक्रिया रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शोक संदेशात दिली आहे.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर मंगळवारी रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांचे निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या त्या प्रमुख महिला नेत्या होत्या. १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदिय कार्यमंत्री ही मंत्रिपदे त्यांनी सांभाळली होती.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री म्हणून १३ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ पर्यंत कार्यभार सांभाळला. लोकसभेच्या २१ डिसेंबर २००९ ते २६ मे २०१४ विरोधी पक्षनेत्या राहिल्या. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून जिंकून आल्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात त्या परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या प्रकृती अश्वस्थतेमुळे राजकारणातुन बाजूला झाल्या होत्या. साधी राहणी उच्च विचार अशी त्यांची ओळख होती. अशी भावना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे.