बीड - गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात जिल्ह्यातील पाटोदा येथील जवान तोसिफ शेख यांना वीरमरण आले. या घटनेने पाटोदा गावावर शोककळा पसरली आहे. शेख यांची आठवडाभरातच औरंगाबादला बदली होणार होती. मात्र, अचानक नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.
नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या तोसिफ शेख यांच्या आठवणीने गहिवरले पाटोदाकर
गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात जिल्ह्यातील पाटोदा येथील जवान तोसिफ शेख यांना वीरमरण आले. या घटनेने पाटोदा गावावर शोककळा पसरली आहे. शेख यांची आठवडाभरातच औरंगाबादला बदली होणार होती.
अत्यंत गरीब परिस्थितीतून तोसिफ शेख हे 26 एप्रिल 2011 क्यू. आर. टी. मध्ये भरती झाले होते. त्यांचे वडील आजही हॉटेलवर काम करतात तर आई घरकाम करते. तोसिफ यांना २ मुले आहेत. एक मुलगा एक वर्षाचा तर दुसरा अडीच वर्षाचा आहे. देशसेवेचे वेड असलेले तोसिफ यांचे महाविद्यालयीन शिक्षण पी.व्ही.पी. महाविद्यालयात झाले आहे. पहाटे उठून व्यायाम करणे हा त्यांचा आवडता छंद होता. कौशिक यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक सैन्यात व पोलीस दलात भरती झाले आहेत. तोसिफ यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या मित्रांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.