बीड : प्रत्येक कुटुंबात महिला हा महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र त्यांच्या समस्या मात्र अनेक काळापासून तशाच आहेत. आजही जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे. मात्र महिलांच्या आजारवर मात्र ठोस पावले उचलले जात नाहीत. एखादा आजार झाल्याच्या नंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजार होऊ नये याच्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असते. त्याच्यासाठी ताज्या पाले भाज्या, फळ, ज्वारी, बाजरी, खजूर यासारखे पदार्थ आहारात असणे गरजेचे असते. आता फास्ट पुढचा जमाना आहे. यामुळे अनेक महिलांना याचा सामना आयुष्यात करावा लागत आहे. मात्र याच्यावर उपाय प्रत्येकाच्या जवळ आहे. मात्र करण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे.
महिलांच्या समस्या: महिला अजूनही त्याच समस्यांना फेस करत आहे. नैसर्गिक रित्या माहिला आणि पुरुष हे विभिन्न आहेत. महिला आणि पुरुषांचे आजारही वेगवेगळे आहेत. महिला बाबतीत तिचा गरोदरपणा असेल, तिची मासिक पाळी असेल, तिची प्रसूती असेल किंवा तिचा मेनोपॉज असेल या वेगवेगळ्या स्टेज मधून महिला जात असतात. तेव्हा तिला त्या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. महिलांशी निगडित हे आजार असतात. महिलांच्या आरोग्यावर समाजाने विचार करणे गरजेचे आहे.
30 टक्के महिलांना हे आजार:शहरी आणि ग्रामीण भागातील माहिलांनमध्ये वेगवेगळे आजार आहेत. शहरी भागामध्ये 40 वर्षाच्या आतीलच महिलांना सांधे दुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. तिच्यामध्ये अनेमियाचे प्रमाण कमी असते. तर वर्किंग वुमन आहे. त्यांना घर सांभाळावे लागते त्याचबरोबर त्यांना त्यांचे आरोग्य ही सांभाळावे लागते. घरातील लहाना माणसापासून मोठ्या माणसापर्यंत व सर्व बारीक सारीक कामाकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. त्या मात्र स्वतःकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या न्यूट्रिशन मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो. महिलांना अनिमिया यासारख्या डिफेन्स मध्ये जावे लागते.आपल्याकडील 30 टक्के महिला ह्या त्यांना स्तनाचे कॅन्सर झालेले आहेत. गर्भाशयाचे आजाराचे प्रमाण शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याची कारणे पण वेगवेगळी आहेत. त्यांची बदललेली लाईफ स्टाईल त्यामुळे गर्भाशय रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर डायबिटीज, हायपर टेन्शन, स्थूलपणा, वजन वाढणे, पीसीयुडी यासारखे अनेक आजार महिलांमध्ये वाढताना दिसत आहेत, यासारखे प्रमाण शहरी भागातील महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी भागामध्ये अनेक स्त्रिया या तीस वर्षाच्या पुढेच लग्न करत आहेत, त्यानंतर त्या ठरवतात मूल होऊ द्यायचे की नाही, फास्ट फुडचा जमाना आहे. लवकर मुलं राहण्यासाठी सुद्धा त्याचा त्रास होतो.