महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश - मंत्री अमित देशमुख

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री अमित देशमुख यांनी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते.

बीड
बीड

By

Published : Oct 20, 2020, 7:13 PM IST

बीड- राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करून प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले.

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री अमित देशमुख यांनी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी १३० ते २०० टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मदत व्हावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले असून राज्य सरकार शेतकऱ्यांना या नुकसानीमध्ये मदत करण्यासाठी पुढे आलेले आहे. राज्य शासनाने गांभीर्याने अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीकडे पाहताना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे, असे सांगत देशमुख पुढे म्हणाले की, तातडीची मदत करण्याची होणारी मागणी विचारात घेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत राज्य शासन निर्णय घेतला जाईल. तसेच नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देखील सादर करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details