बीड - मुंबई, पुणे अथवा इतर कंटेनमेंट झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्या. जेणेकरून त्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे. शनिवारी बीड जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
'रेड झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्या' - beed corona
मुंबई, पुणे अथवा इतर कंटेनमेंट झोनमधून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्या. जेणेकरून त्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवता येईल, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात
ग्रामीण भागात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता-
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कामधंद्याच्या शोधात पुणे-मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे नागरिक परत आपल्या गावी आलेले आहेत. गावी आलेल्या नागरिकांमधील अनेकांनी विनापरवानगी अथवा आरोग्य विभागाला माहिती न देताच गावात प्रवेश केलेला आहे. आशा नागरिकांची माहिती घेऊन त्यांना तत्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य ती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा गावे असुरक्षित होऊ शकतात.