बीड -जिल्ह्यात दिंद्रुड नित्रुड गंगामसला महसूल मंडळातील गावातील शिवार पाहणी दरम्यान कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. उशिरा आलेल्या बोंड अळीमुळे दुबार घेतलेल्या कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे.
हेही वाचा -राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य नाही; बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या कालावधीवर शंकेला वाव
गेल्या वर्षी कृषी विभागाच्या जन जागृतीमुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कीटकनाशकाच्या फवारणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे बोंड अळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला नव्हता. यावर्षी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि फवारणीमुळे सुरुवातीच्या काळात बोंड आळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. परंतु अवेळी झालेला पाऊस वातावरणातील अतिरिक्त आद्रतेमुळे गुलाबी बोंड आळी वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी कपाशीचे दुबार पीक घेण्याचे टाळावे आणि जमीनीच्या ओलीचा फायदा घेत वेळेतच कपाशी काढून हरभरा, गहू पेरणी करावी, अशी सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार