महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 9, 2021, 3:40 PM IST

ETV Bharat / state

मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत नगर परिषदेकडून स्वतंत्र व्यवस्था

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा बीड जिल्ह्याचे पालकमंञी धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक आणा कराड यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपाध्यक्ष शकिल कुरेशी, सभापती, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे कोरोना काळातील जोखमीचे काम नगर परिषद कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करत आहे. शहरात सरकारी व खाजगी कोवीड रुग्णालय मिळुन बारा कोवीड रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत.

मृतांचा अंत्यविधी
मृतांचा अंत्यविधी

बीड - परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परळी नगर परिषद शहरात निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहिम राबवत आहे. मात्र दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीकरिता नगर परिषदेमार्फत शहरातील सार्वजनिक स्मशानभुमीतील दोन स्वतंत्र शेडची व्यवस्था केली असल्याचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा बीड जिल्ह्याचे पालकमंञी धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक आणा कराड यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपाध्यक्ष शकिल कुरेशी, सभापती, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे कोरोना काळातील जोखमीचे काम नगर परिषद कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करत आहे. शहरात सरकारी व खाजगी कोवीड रुग्णालय मिळुन बारा कोवीड रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत. दरम्यान या रुग्णालयात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी मोठी अडचण होते. परंतु परळी नगर परिषदेच्या वतीने एक शववाहिनी, अंत्यविधीसाठी दोन स्वतंत्र शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्यही नगर परिषदेमार्फत निशुल्क उपलब्ध करुन दिला जात आहे. आतापर्यंत जवळपास 44 कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार करण्यात आले आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी किंवा कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी परळी नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना संपर्क करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details