महाराष्ट्र

maharashtra

बीड जिल्ह्यात रोड रॉबरीच्या घटना वाढल्या, वाहन चालकांसह नागरिकांत दहशत

धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाडळसिंगीजवळ मालवाहू ट्रक चालकाला बेदम मारहाण करत लुटल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा केज-कळम रोडवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवत हा प्रकार घडला आहे.

By

Published : Nov 10, 2022, 6:55 PM IST

Published : Nov 10, 2022, 6:55 PM IST

पोलीस ठाणे केज
पोलीस ठाणे केज

बीड - ट्रकचालक बाळू सुग्रीव गदळे रा. (दहिफळ वडमाऊली) ता. केज यांची (ट्रक क्रमांक एम.एच 10/ सीआर 9466)हा सोयाबीनचे होते भरून अहमदपुरहून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरकडे जात होता. त्याचे वाहन केज कळंब रोडने जात असताना मांगवडगाव फाट्याजवळ खराब व कच्च्या रस्त्यामुळे वाहनाचा वेग कमी असताना रात्री पावणे अकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाडीवर चढून ट्रकमधील सोयाबीनचे पोते ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मारहाण झाली आहे.

चोरीची घटना लक्षात आल्यानंतर वाहन चालकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी वाहन चालक व त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच, त्याच्या डाव्या दंडाला चावा घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालक बाळू सुग्रीव गदळे यांच्या तक्रारीवरून (दि. 8 नोव्हेंबर)रोजी संशयित चोरटे अजय रमेश विटकर राहणार वाघोली पुणे राम संतोष पवार आणि निखिल बाळू पवार, कृष्णा हनुमंत जाधव रा. राळेगाव जि उस्मानाबाद यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाडळसिगी येथे अज्ञात चार चोरट्यांनी गाडी अडवत काच फोडून चाकुचा धाक दाखवत चालकाजवळील 11 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील 50 ते 60 लिटर डिझेल लंपास करत गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील सारंगपुर येथून चालक सिताराम मेना (वय 30) व किन्नर सुरेश मेना (वय 24) हे दोघे (आर. जे. 14 जी.सी 4536)या ट्रकने माल वाहून कर्नाटक राज्यातील विजापूर येथे निघाले असता आज पहाटे 3 च्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी जवळ आले. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून गाडी अडवी लावत त्यांना लुटले आहे. रोड रॉबरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details