बीड - जिल्ह्यात २४ तासांत शिक्षक, तरुण आणि एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या ( three people committed suicide ) केल्याची घटना घडली आहे. या तिन्ही घटना माजलगाव तालुक्यातील असल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथील सुरेश रामकिसन बडे ( वय ३७, रा.गावंदरा ता.धारूर ) या शिक्षकाने गुरुवारी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी नैराश्यातून घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या घटनेची माहिती माजलगाव शहर पोलिसात दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली आहे.
Three Suicide : एकाच दिवशी तिघांची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील घटना - आर्थिकव व्यवहारातून आत्महत्या
बीडमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी एक शिक्षक आहे, एक तरुण तर एकाने आर्थिक व्यवहारातील जाचास कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच दिवशी तिघांची आत्महत्या