महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव, 24 तासात पती ताब्यात - खून

चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात अवजड हत्यार घालत हत्या करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोनाली सापते

By

Published : Nov 19, 2019, 1:12 PM IST

Updated : Nov 19, 2019, 3:29 PM IST

बीड- जिल्ह्यातील आष्टी शहरातील किनारा चौकात दुचाकीला रिक्षाने धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. या प्रकरणात एक महिला ठार झाली. सुरुवातीला हा केवळ अपघात आहे, असे मृत महिलेचा पती व त्याच्या एका साथीदाराकडून बनाव केला होता. आष्टी पोलिसांनी घटनेनंतर24 तासात केलेल्या तपासाला कलाटणी मिळाली. त्या महिलेचा अपघात नव्हता तर पतीने डोक्यात अवजड हत्यार घालून खून केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ माजली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सोनाली सापते (वय 40 वर्षे) या महिलेचा विवाह आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील नितीन आवारे (रा. चिखली) या व्यक्तीशी झाला होता. मात्र, त्यांचे पटत नसल्यामुळे दोघेही मागील ६ वर्षांपासून वेगळे राहत होते. पती नितीन हा सोनाली यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. या वादातूनच ते विभक्त झाले होते. मात्र, सोनालीवर पती नितीनचा प्रचंड राग होता. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने सोमवारी शहरातील किनारा चौकातील ईदगाह रोडवर पत्नी सोनाली सापते यांचा खून केला.

सोनाली या मुर्शतपूर येथे राहत होत्या. त्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लिपिक म्हणून काम करत होत्या. सोमवारी कामानिमित्त त्या मुर्शतपूरवरून आष्टी शहरात आपल्या दुचाकीवर आल्या होत्या. काम आटोपून परत मुर्शतपूरकडे जाताना दबा धरून बसलेला पती नितीन आवारे याने रोडवर सोनाली यांना अडवले व डोक्यात अजवड हत्याराने जोरात घाव घातला. तेवढ्यात नितीन आवारे याचा मित्र भाऊसाहेब बाबुराव धोंडे (रा.आष्टी) याने आपली रिक्षा (एम एच 42 बी 4846) ही सोनाली यांच्या दुचाकीला जोरात धडकवत अपघात झाल्याचा बनाव केला व तो वाहन चालक आष्टी पोलीस ठाण्यात जाऊन बसला. तत्पूर्वी त्याने सोनाली यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याचे देखील नाटक केले होते. प्रगती मुळीक यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलीच्या संशयावरून बदलली तपासाची दिशा -
मृत सोनाली सापते यांची विवाहीत मुलगी प्रगती संदेश मुळीक या पुण्याला असतात. त्यांना त्यांच्या आईच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आष्टीला येऊन पोलिसांची भेट घेत आईचा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कारण आई-वडिलांमध्ये सतत भांडणे होत असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. केवळ 24 तासात या अपघातातील सत्यता समोर आली. चक्क सोनाली यांच्या पतीने मित्राच्या मदतीने पत्नीचा खून केल्याची बाब समोर आल्याने या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Nov 19, 2019, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details