परळी(बीड) : परळी शहरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण केले जात आहे. मात्र शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने या केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होताना दिसत आहे.
परळीत लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा
शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने या केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होताना दिसत आहे.
लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी
याशिवाय शहराची लोकसंख्या एक लाखांच्या घरात असताना शहरासाठी 200 ते 300 लसच दिल्या जात असल्याने यामुळे वारंवार लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याचेही चित्र असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे परळीतील जनतेला कोणी वाली नसल्याची प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. दिवसभर रांगेत थांबुनही लस मिळत नसल्याने हिरमोड होत असल्याची तक्रार अनेक नागरिक करताना दिसत आहेत. शहराची लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्र वाढवून लसींचा पुरवठाही वाढविला जावा अशी मागणी नागरिक करत आहेत.