बीड - परळी तालुक्यातील लिंबोटा येथील तांडा परिसरात असलेल्या कडब्याला आग लागली. या आगीत जवळच असलेल्या तीन घरांना या आगीचा तडाखा बसला. यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य जाळले आहे. तांडा परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.
परळी तालुक्यात कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत तीन घरे जळाली
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील तांडा परिसरात असलेल्या कडब्याला आग लागली. या आगीत जवळच असलेल्या तीन घरांना या आगीचा तडाखा बसला. यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य जाळले आहे. तांडा परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, परळी तालुक्यातील लिंबोट्याच्या तांडा येथील हनुमान मंदिर मागे असलेला हजारो कडब्याच्या पेंड्याची गंज होती. ती अचानक पेट घेतल्याने या आगीत हजारों रुपयाचा कडबा जळाला. ही आग पसरत जाऊन, आजूबाजुला असलेल्या तीन घराला याचा फटका बसला. ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
रंगनाथ रेवा जाधव, कोंडीबा रामा जाधव, रमेश साहेबराव चव्हाण, रामकिसन कोंडीबा जाधव आणि गोपीनाथ कोंडीबा जाधव यांचे घरे या आगीत जळाले आहेत. आगीने पेट घेतल्या दरम्यान, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड युवा नेते प्रशांत कराड यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच वैद्यनाथ कारखाना, परळी नगर पालिका, थर्मलच्या अग्निशमन दलाच्या बंबनेही घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.