महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kankaleshwar Temple Beed : कनकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घ्याल तर होतील मनोकामना पूर्ण, काय आहे आख्यायिका... - मंदिर

महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारे बीडमधील हजारो वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी कनकालेश्वर मंदिराचे खास वैशिष्ट्य मानले जाते. कनकालेश्वर मंदिर हे पश्चिम मुखी मंदिर असून हे मंदिर चारही बाजूंनी संपूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे.

Hemadpanthi Temple Beed
हेमाडपंथी कनकालेश्वर मंदिर

By

Published : Feb 14, 2023, 10:58 PM IST

Updated : Feb 20, 2023, 6:06 AM IST

बीडमधील हेमाडपंथी कनकालेश्वर मंदिर

बीड : शहरातील 2000 हजारो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर हे महाराष्ट्राच्या वैभवात भर घालेत. या हेमाडपंथी मंदिराचे नाव कंकालेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृह असा तलविन्यास या हेमाडपंखी मंदिराचा आहे. हे मंदिर चारही बाजूंनी संपूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे आणि पाण्याची पातळी 40 ते 50 फूट खोल आहे. मंदिराच्या आजूबाजूला कुठेही विहीर नाही, हे जिवंत पाणी आहे, या मंदिराला जे पाणी आहे ते गुप्तगंगा आहे, ते पाणी गंगेवरून येते असे सांगितले जाते.

छत आहे घुमटाकार : मंदिराच्या तीनही बाजूने अंतराळुक्त गर्भ ग्रह आहेत. तर तीनही गर्भ ग्रह सारख्याच आकाराची आहेत. या मंदिराचा मंडप अष्टकोणी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभ जोडी आहे. या 16 स्तंभावर घुमटाकार छत पसरलेला आहे. हे छत पुढे पुढे लहान होत गेल्याने वर्तुळा कृतीला यांनी बनलेले आहे छतावर फुलांची नक्षी असल्याने दिसण्यास सुंदर दिसतात.

देव देवितांच्या मूर्ती : कंनकालेश्वर मंदिर हे बाहेरील भागात विविधता युक्त असून सगळ्या खालचा थरात चौकटच्या नक्षीचे तर सगळ्यात वरच्या थरात कीर्ती मुखानी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देव कोष्टामध्ये शक्ती ब्रह्म आणि शिव सांप्रदायातील देव देवितांच्या मूर्ती आहेत. तसेच मंडपावरही विष्णूचे दहा अवतार आणि अष्टदिव्य कल्प दाखवले आहेत. कंकालेश्वर मंदिराच्या गर्भग्रहाद्वारे पंच शाखा प्रकारची असून त्यावर कमळ दल पुष्प आणि व्याल यांचे अलंकार आहेत. त्यामुळे हे मंदिर अत्यंत दिसण्यास सुंदर आहे.



काय आहे मंदिराचे वैशिष्ट्य : मंदिराचे पुजारी चंद्रकांत गुरव यांनी सांगितले की, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे कनक म्हणजे सुवर्ण काले म्हणजे सोन्याच्या घरात राहणारे हे दिगंबर, अशी या मंदिराला उपमा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्री, मकरसंक्रांती, रामनवमी उत्सव, श्रावण मास उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाशिवरात्रीला चार दिवस या ठिकाणी यात्रा भरते. दोन दिवस भंडारा व एक दिवस कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये असे कुठेही मंदिर नाही, जगात असे शिल्प कुठेही दिसत नाही कारण या मंदिराला चारही बाजूने पाणी आहे.

मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम : ते पुढे म्हणाले की, मंदिराला दगडी पुलावरून यावे लागते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये याची पाणी पातळी कमी होते. तर उन्हाळ्यामध्ये जसजसे लागेल तसे तसे पाणीच्या पातळीत वाढ होते. आणि दगडी फुलावर पूर्णतः पाणी असते. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे आणि याला कसल्याही प्रकारचे माती किंवा चुना वापरलेला नाही फक्त दगडावर दगड रचून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. हजार वर्षापूर्वी या मंदिराला अशी रोषणाई असायची की 10 किलोमीटर अंतरावरून हे मंदिर चमकायचे. कारण हिरे मोती माणिक सोन्याने नटलेल हे मंदिर होते. त्या काळामध्ये मंदिरावर अनेक अतिक्रमण झाली आणि याच अतिक्रमणामुळे अनेक मंदिराचे वैभव हिरावले गेले होते.

कनाकालेश्वर मंदिर इतिहास : मंदिराचे पुजारी चंद्रकांत गुरव यांनी सांगितले की, या मंदिराचे नाव कनकालेश्वर. कनक म्हणजे सोने आले. श्वर म्हणजे ईश्वर म्हणून कनकालेश्वर असे नाव पडलेले आहे. हे मंदिर म्हणजे इसवी सन 2 हजार वर्षांपूर्वीच मंदिर आहे. याठिकाणी भृगू ऋषी, अत्र ऋषी त्यांनी तपश्चर्या करून शिवलिंग आणि जलकुंभाची स्थापना केलेली आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून इसवी सन 2000 वर्षांपूर्वीची हे बांधकाम आहे. भृगू ऋषींनी या मंदिराची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी पाणी नव्हते मग गुप्त जल स्तंभ उभारला व गुप्तगंगेची स्थापना करून जल कुंभाची स्थापना केलेली आहे.

हेही वाचा :Shani Mandir In Beed : शनीचे साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ बीड जिल्ह्यात, असा आहे इतिहास...

Last Updated : Feb 20, 2023, 6:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details