महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळी - अंबाजोगाई रस्त्यावरील पूल वाहून गेला - Parli Ambajogai road bridge flowed

पावासाच्या पाण्यामुळे परळी - आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेला पूल वाहून गेला.

bridge washed away Parli Ambajogai road
जोरदार पाऊस परळी वैजनाथ

By

Published : Jun 9, 2021, 7:13 PM IST

Updated : Jun 9, 2021, 8:21 PM IST

परळी वैजनाथ (बीड) -परळी - आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून कन्हेरवाडी जवळ पडलेल्या पावसाचे पाणी डोंगरातून मोठ्या प्रमाणावर वाहत आल्याने या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेला पूल, सिमेंटच्या नाल्यासह वाहून गेला.

परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील पूल वाहून गेला

हेही वाचा -विमा कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालणारा 'बीड पॅटर्न', जाणून घ्या माहिती

शहर व परिसरात गेल्या तीन, चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून आज दुपारी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नंदागौळ, कन्हेरवाडी, हेळंब, दौंडवाडी या परिसरातील गावांत ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडला. दरम्यान परळी - आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून कन्हेरवाडी जवळ पडलेल्या पावसाचे पाणी डोंगरातून मोठ्या प्रमाणावर वाहत आल्याने या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेला पूल, सिमेंटच्या नाल्यासह वाहून गेला. या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने पावसाळ्याच्या अगोदर या पुलाचे करणे होणे आवश्यक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. शहरापासून कन्हेरवाडी गावाचा संपर्क तुटला असून सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली होती.

हेही वाचा -आष्टी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस 3 दिवसांची कोठडी

Last Updated : Jun 9, 2021, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details