केज (बीड)शनिवारी रात्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. येडेश्वरी कारखान्याच्या साखरेच्या गोदामामध्ये पावसाचे पाणी शिरले, यामध्ये तब्बल 51 हजार क्विंटल साखरेचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिली.
कारख्यान्यात पाणी शिरूर साखरेचे नुकसान
आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याने कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार केला होता. प्रतिदिन 3900 मे. टन उसाचे गाळप सुरू होते. आतापर्यंत 6 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. मात्र शनिवारी सायकाळी परिसरात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे साखर कारखान्याच्या गोदामात पाणी शिरले, पाणी गोदामात शिरल्यामुळे 51 हजार क्विंटल साखरेचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता