बीड- जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदीचे पाणी शिरल्याने शनी मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे. याशिवाय राक्षसभुवनजवळील गंगावाडी येथील शेतकरी शंकर नवले यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी जाऊन एका गाईचा मृत्यू झाला आहे. तसेच शेतीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीडमध्ये पावसाचा जोर कायम; गोदावरीला पुर तर शनी मंदिर पाण्याखाली
पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी धरणातील पाणी पुन्हा एकदा गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून या नदी तिरावरील साडेतीन पिठापैकी एक असलेले राक्षसभुवनचे शनी मंदिर गत दोन महिन्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्यात 576. 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तर मागील चोवीस तासात सरासरी 38.7 मि. मी. पाऊस झाला आहे. जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले गेले असून ५२ हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी धरणातील पाणी पुन्हा एकदा गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून या नदी तिरावरील साडेतीन पिठापैकी एक असलेले राक्षसभुवनचे शनी मंदिर गत दोन महिन्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचा जोर अधिक राहिला आहे.
२००६ च्या पुरपरिस्थितीनंतर म्हणजे तब्बल १३ वर्षानंतर गोदावरी नदी दुथडी भरुन वाहिली. राक्षसभुवनच्या शनी मंदिराचा गाभारा तब्बल तेरा वर्षानंतर पाण्यात गेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली शनीदेवाची मूर्ती दुसऱ्या वेळेस पाण्यात झाकली गेली आहे. सध्या दर्शनासाठी येणाऱ्या शनी भक्तांना दुरुनच दर्शन घ्यावे लागत आहे. दरम्यान भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुहास चौथाईवाले यांनी सांगितले.