महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Return Monsoon in Beed : बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने 7 लाख 87 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, सरकार मदत जाहीर कधी करणार ? - बीडमध्ये परतीच्या पावसाने खरिप पिकांचे नुकसान

जिल्ह्यात सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने खरिप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान ( Heavy crop damage due to return rains )केले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह इतर पिके उध्वस्त झाली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही मदत जाहीर केली नाही. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईसाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. ऐनदिवाळीतही सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली नाही, यामुळे शेतकऱ्यांना सरकार मदत कधी जाहीर करणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Heavy crop damage due to return rains
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने 7 लाख 87 हजार शेतकऱ्यांचे नुकसान

By

Published : Oct 30, 2022, 6:28 PM IST

बीड :जिल्ह्यात सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने खरिप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान ( Heavy crop damage due to return rains )केले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह इतर पिके उध्वस्त झाली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही मदत जाहीर केली नाही. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईसाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. ऐनदिवाळीतही सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली नाही, यामुळे शेतकऱ्यांना सरकार मदत कधी जाहीर करणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


सोयाबीन व कापूस पिकांना मोठ्या प्रमाणात फटका - बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावे लागते. गेल्या तीन वर्षापासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस हे दोन्ही प्रमुख पिके खराब झाली. या दोन्ही पिकावरच सर्वसामान्य शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र पावसाने जाता जाता शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने 7 लाख 87 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे झाले तरी मदतीची प्रतिक्षा - अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार पंचनामे झाले असले तरी शेतकर्‍यांची दिवाळी मात्र गोड ऐवजी कडू झाली. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाली असल्याची नोंद करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. आता ही मदत नेमकी कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना विविध आश्‍वासने दिली होती. या परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाने आश्‍वासनाची पुर्तता करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details