महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचे बनले आधार - बीड कोविड सेंटर

बीड तालुक्यातील चौसाळा येथील 'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचा आधार बनले आहे. पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या चौसाळा येथील या सेंटरमध्ये एक महिन्यात साडेतीनशे रुग्ण बरे झाले आहेत.

'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचे बनले आधार
'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचे बनले आधार

By

Published : May 27, 2021, 9:08 PM IST

बीड - बीड तालुक्यातील चौसाळा येथील 'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचा आधार बनले आहे. पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या चौसाळा येथील या सेंटरमध्ये एक महिन्यात साडेतीनशे रुग्ण बरे झाले आहेत. याबाबतची माहिती डॉ. ऐश्वर्या मनचुके यांनी दिली आहे. हे सेंटर चौसाळा सर्कलचे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी स्वखर्चातून सुरू केले आहे.

'स्वर्गीय चांदनजी लोढा कोविड सेंटर' परिसरातल्या 40 गावांचे बनले आधार

'सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सेवा'

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून १ महिन्यापूर्वी लोढा यांनी स्वतःच्या शाळेच्या इमारतीतच 100 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर सुरू करण्यापूर्वी चौसाळा परिसरातील नागरिकांना बीडला जावे लागत होते. 35 ते 40 किलोमीटर प्रवास करून बीड येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णाला अडचणी येत होत्या. मात्र, चौसाळा येथील या कोविड सेंटरमुळे चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमधील लोकांची सोय झाली आहे. यामध्ये घारगाव, सुल्तानपूर, गोलंगरी, पालसिंगण, पिंपरी चांदेगाव, रोळसगाव यासह 40 गावातील लोकांना कोरोनाच्या संकटकाळात या सेंटरचा आधार मिळाला आहे.

'भीती नको, काळजी महत्त्वाची'

कोरोनाच्या या काळात मनामध्ये भीती बाळगण्यापेक्षा स्वतःची व आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चौसाळा सर्कलचा प्रतिनिधी म्हणून, येथील नागरिकांच्या अडचणीत त्यांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. कोरोनामध्ये भयभीत झालेल्या नागरिकांना आधार मिळावा, चांगली आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने मी हे कोविड सेंटर सुरू केलेले आहे. इथे दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणाची, त्याचबरोबर त्यांना देण्यात येणाऱ्या औषध गोळ्यांची वेळेवर पूर्तता करणे एवढेच माझे काम आहे, असे अशोक लोढा म्हणाले.

'तीन डॉक्टर व पाच परिचारिकांचा स्टाफ'

100 खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये आम्ही विशेष करून ऑक्सिजनचीही व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून अचानक एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागली, तर त्यासाठी आम्ही एक ऑक्सिजन मशीन तयार ठेवलेली आहे. याशिवाय तीन डॉक्टर व पाच परिचारिका प्रत्येक शिफ्टमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी इथे कार्यरत असतात. तसेच, आरोग्य सेवेबरोबरच रुग्णांना आधार देण्यासाठी रुग्णांचे समुपदेशनही आम्ही करतो, अशी माहिती डॉ. अंकुश मनचुके यांनी दिली.

हेही वाचा -अदर पुनावाला धमकी प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी - उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details