महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Crime News : कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा केला खून

केज तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसावस्ती येथे नवऱ्याने बायकोवर धारदार कुऱ्हाडीने वार करीत खून केला. खून केल्यानंतर नवऱ्याने पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली आहे.

He Killed His Wife with an Ax Wound; After Killing His Wife, Accused Appeared at Police Station
कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा केला खून

By

Published : Feb 7, 2023, 9:29 PM IST

बीड :माजलगावच्या टाकरवन येथील मुलाने बापाच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा केज तालुक्यात थरारक घटना घडली आहे. नवऱ्याने बायकोचा गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीचे वार करून तिचा जागीच खून केला. केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसावस्ती नावाने ओळखल्या जात असलेल्या वस्तीवर मंगळवार रोजी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.२० भगवान शाहुराव थोरात (वय. ३३ वर्षे) याने त्याची पत्नी सौ. आरती भगवान थोरात (वय. २७ वर्षे) याने धारदार कुऱ्हाडीचे गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला.

असा आहे घटनाक्रम :ही घटना घडली त्यावेळी भगवान याचे आई-वडील हे एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेले होते. तर सौ. आरती व भगवान थोरात यांनी दोन्ही मुले चि. स्वराज आणि चि. विराज हे केज येथील शाळेत गेलेले होते. आरोपी भगवान हा केज येथील सरकारी दवाखान्याजवळ त्याचे एक ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज चालवीत होता. सकाळी भगवान थोरात याने मुलांना केज येथे शाळेत सोडून गेला. त्यानंतर त्याने गॅरेजवर येण्याऐवजी तो ढाकेफळ येथे घरी गेला होता.

बायकोला काही कळण्याअगोदर केला घात :घरी आल्यानंतर भगवान थोरात याने भरदुपारी ३.०० च्या दरम्यान जवळ कोणी नसताना डाव साधला. घराच्या बाहेर दरवाजाजवळ पडलेली कुऱ्हाड घेऊन बायकोजवळ आला. बायकोने कुऱ्हाड पाहिल्यानंतर नवऱ्याला प्रश्नदेखील विचारला, कशाकरिता कुऱ्हाड घेतली. परंतु, तिला गॅरेजवरील माणसाला लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर बायको घरात काम करायला मागे वळाली तेवढ्या भगवान थोरात याने डाव साधला. पहिला मानेवर घाव घालताच, ती खाली पडली. त्यानंतर त्याने छातीवर वार करीत सौ. आरती हिचा निर्घृण खून केला. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला कोणीच नव्हते.

खून केल्यानंतर आरोपी भगवान थोरात पोलीस स्टेशनमध्ये हजर :आरोपी भगवान थोरात यानेखून केल्यानंतर कुऱ्हाड प्रेताजवळच टाकून, तो स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. अधिकाऱ्यांना त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्यातील नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस फौजफाटासह घटनास्थळी हजर झाले. भगवान थोरात याने त्याची पत्नी सौ. आरती हिचा खून का केला? याची माहिती अद्याप समजलेली नाही. या खुनाची माहिती मिळताच

ABOUT THE AUTHOR

...view details