बीड - येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील उपायुक्त हर्ष पोद्दार यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्ष पोद्दार बीडचे नवे पोलीस अधीक्षक; जी. श्रीधर यांची बदली - जी. श्रीधर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाल पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकाल पूर्ण केलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाने काढले. जी. श्रीधर यांनी जानेवारी २०१७ मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकपदाची सुत्रे हाती घेतली होती. पोलीस अधीक्षक म्हणून पहिलीच नेमणूक असताना जी. श्रीधर यांनी बीडला रुजू झाल्यानंतर चांगले काम केले.
जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात पोलीस दलाच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. आता त्यांची गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे समादेशक राज्य राखीव बल गट क्र. १३ येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची नेमणूक झाली आहे.