बीड - गेवराई तालुक्यामधील कोळगाव शिवारातील सूर्यमंदिर संस्थानचे हनुमान महाराज यांनी रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकत आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. माझ्या चारित्र्यावर संशय घेत माझ्यावर ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन माझी बदनामी करण्यासाठी गावातील काही लोकांनी कट रचला होता. असे सांगत हनुमान महाराज यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अद्यापपर्यंत हनुमान महाराज यांचा तपास लागला नाही. त्यांचे भक्त व चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस सर्वत्र शोधाशोध करत आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोबाईल बंद होता व ते शोधूनही सापडत नसल्याचे भाविकांनी सागितले.
हनुमान महाराजांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्येची धमकी - हनुमान महाराजांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्येची धमकी
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील कोळगाव शिवारातील सूर्यमंदिर संस्थांचे हनुमान महाराज यांनी रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकत आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे
चिठ्ठीत न्यायाची मागणी-
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळगाव शिवारात सूर्य मंदिर संस्थान आहे. त्या सूर्य मंदिर संस्थानच्या ठिकाणी हनुमान महाराज गेल्या अनेक वर्षापासून राहतात. त्यांनी रविवारी एका व्हिडियो मधून गावातील काही लोक मला जाणिवपूर्वक त्रास देत असल्याचे सांगत एक चिठ्ठी लिहिली आहे. याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यांची बदनामी करणाऱ्या आणि नाहक त्रास देणाऱ्यांच्या नावांचा चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे. तसेच माझ्या मृत्यू पश्चात संबंधितांवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.