बीड- सोने विक्री करताना सोनारांना आता हॉलमार्क असलेलेच सोने विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा देखील लोगो सोने खरेदी केलेल्या वस्तूवर राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे सोने मिळेल व ज्या ठिकाणाहून सोने घेतले त्या दुकानदाराच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जरी ते सोने मोडले तरी हॉलमार्क असल्यामुळे सोन्याच्या वस्तु चे चांगले पैसे ग्राहकांना मिळू शकतील, अशी माहिती बीड येथील सचिन ज्वेलर्सच्या प्रमुख कल्पना डहाळे यांनी दिली.
सोने व दागिना हा विशेष करून महिलांसाठी आवडीचा विषय आहे. आता केंद्र सरकारने या सोन्याच्या शुद्धते बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हॉलमार्क सोने खरेदी विक्री बाबत अजून म्हणावा, तशी अंमलबजावणी चोखपणे होत नसली तरी भविष्यात ज्वेलर्स चालकांना हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी- विक्री करता येणार आहे. हा निर्णय ग्राहकांसाठी फायद्याचा असल्याचे सोनारांनी सांगितले.
पूर्वीदेखील सोन्याच्या शुद्धतेला प्राधान्य होतेच-