महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गायरान धारकांच्या विविध प्रश्नांवर परळी ते बीड पायी दिंडी - गायरान हक्क अभियान परळी

गायरान धारकांच्या विविध प्रश्नांवर परळी ते बीड पायी दिंडी (लॉन्ग मार्च) परळी येथील उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारत येथे निवेदन देऊन दि.२३ जानेवारी रोजी ऍड.व्ही. एस.लोखंडे, परमेश्वर जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली परळीतून सुरुवात होऊन अंबाजोगाई तसेच केज मार्गे मांजरसुम्बा ते बीड येथे दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

परळी
परळी

By

Published : Jan 23, 2021, 10:43 PM IST

परळी (बीड)- गायरान हक्क अभियानांतर्गत गायरान धारकांच्या विविध प्रश्नांवर परळी ते बीड पायी दिंडी (लॉन्ग मार्च) परळी येथील उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारत येथे निवेदन देऊन दि.२३ जानेवारी रोजी ऍड.व्ही. एस.लोखंडे, परमेश्वर जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली परळीतून सुरुवात होऊन अंबाजोगाई तसेच केज मार्गे मांजरसुम्बा ते बीड येथे दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

तहसील कार्यालय परळी वै. येथे आरंभ झालेल्या या लॉन्ग मार्चला संभोधित करतांना फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे म्हणाले की, भारतीय संविधानानुसार गायरान जमीन तसेच सरकारी पडीक जमीनीचे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयातील भूमिहीनांना समान वाटप करण्यात यावे. तसेच मागील ३० ते ४० वर्षांची गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावेत, गायरान धारकांचे १ ईला नोंद नाही, त्यांच्या नोंदणी करून पेरणीचे पंचनामे करावेत, भूमिहीनांची अतिक्रमणे नियमित करावे. तसेच जगपालसिंग वि. पंजाब राज्य या निकालाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विविध ठिकाणचे किल्लेधारूर गट क्र.२२९, १६२, ता.केज गट क्र.१४३ व अंबाजोगाई तालुक्यातील सर्वे क्र.१७ मधील अतिक्रमण धारकांना सन १९८१ ला शिक्षा भोगली असतांना तांत्रिक बाबी पुढे करून टाळाटाळ करीत असल्याबाबत आदी मागण्यांसह लॉन्ग मार्च दि.२६ जानेवारीला बीडला धनकणार आहे.

परळी येथे ऍड.व्ही. एस.लोखंडे, परमेश्वर जोगदंड, भगवान साकसमुद्रे, डॉ.आनंद गायकवाड, अशोक पालखे, ऍड.डी.एल.उजगरे, नगरसेवक केशव गायकवाड, दहीवडे, जितेंद्र मस्के सह अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details