बीड:गुप्तहेराच्या माहिती आधारे जिजामाता नगर येथे सुनील कदम यांच्या घरी गुटखा विक्रीसाठी मालाची साठवून केलेली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी रात्री 11.00 च्या सुमारास सुनील अश्रुबा कदम यांच्या राहत्या घरी छापा टाकला आणि त्या ठिकाणी तपासणी करत त्यामध्ये त्यांना 2 लाख 13 हजार 667 रुपयांचा गुटखा आढळला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी सुनील कदम याची चौकशी केली असता हा माल कुठून आला असे विचारले. यावेळी त्यांनी मैदा येथून बाळू घुंबरे यांच्या आखाड्यावरून श्रीधर रवींद्र ठोंबरे यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल :त्याच रात्री बाळू घुमरे यांच्या आखाड्यावर 2 वाजता जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर त्या ठिकाणी 34 लाख 7 हजार 600 रुपये किमतीचा गुटखा सापडला. माजलगावचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील आश्रुबा कदम , श्रीधर रवींद्र ठोंबरे, बाळू उमरी यांच्यावर 328 188, 272, 273,34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतही गुटखा जप्त :रबाळे एमआयडीसी पोलिसांनी डिसेंबर, 2022 मध्ये गुटख्याचा ट्रक पकडत तब्बल 62 लाखांचा गुटका जप्त केला होता. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली होती. तर चार जण फरार झाले होते. सागर गोहेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव होते.