बीड :शनिवारी बीड जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कालिकादेवी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यात खोकरमोहा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा नवोदय पात्रता परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांला गुजराती माध्यमात फॉर्म भरण्यात आला. त्यामुळे त्याला गुजराती माध्यमाच्या प्रवेशपत्राबरोबर त्याला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आली. ज्याला गुजरातीचा कुठलाच अभ्यास नसल्याने त्या विद्यार्थ्याला शिक्षकांच्या चुकीने तोच पेपर सोडवावा लागल्याचा प्रकार घडला.
गुजराती माध्यमाचा पेपर :शनिवारी परीक्षा केंद्रावर गेलो असता मला गुजराती भाषेचा पेपर मिळाला. वर्षभर केलेला अभ्यास वाया गेला. माझे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संदीप मुळीक याने दिली. शनिवारी माझ्या मुलाची नवोदयची परीक्षा होती. शिरूर येथील कालिंका विद्यालय येथे, तो खोकरमोह जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याचा पेपर शिरूर येथील कालिका विद्यालय येथे होता. तो मराठी माध्यमाचा असताना त्याला गुजराती माध्यमाचा पेपर देण्यात आला, त्याला ते समजत नव्हते. म्हणून मी त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांशी संपर्क केला.