महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रखडलेले २३ कोटी व वाढीव ५ कोटी निधी देणार ; पालकमंत्री मुंडेंची घोषणा - गहिनीनाथगडास निधी देणार ; पालकमंत्री मुंडेंची घोषणा

गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

Munde's announcemen
पालकमंत्री मुंडेंची घोषणा

By

Published : Feb 5, 2021, 8:00 PM IST

बीड- आमच्या सरकारच्या काळात जिल्ह्यात येत्या चार वर्षात विकासाचे असे काम करू की, पुढील अनेक वर्ष विरोधकांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील, असे विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मागील सरकारच्या काळात 'ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार असल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले.

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतम मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, मा.आ. साहेबराव दरेकर, मा.आ. भीमराव धोंडे, सतिष शिंदे, जयदत्त धस, शिवभूषण जाधव, आप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, विश्वास नागरगोजे, शिवाजीराव नाकाडे, सतिश बडे यांसह गडाचे वारकरी - टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत वामनभाऊ यांच्या जीवन चरित्रावर आधारित ओवी स्वरूपातील ग्रंथाचे यावेळी ना. मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखन संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प. प्रमोद दिगंबर महाराज यांनी केले असल्याची माहिती विठ्ठल महाराजांनी दिली.

...या आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे - मुंडे

वामनभाऊंच्या प्रति आपली श्रद्धा आज इथपर्यंत, या पदापर्यंत मला घेऊन आली, गडाचा भक्त म्हणून मी नेहमीच कृतज्ञ राहीन, जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हा माझ्यासाठी भाऊंचा - देवाचा आशीर्वाद असून, या आशीर्वादापुढे जगातील कोणतेही संकट तोकडे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा - औरंगाबाद-पुणे माहामार्गावर भीषण अपघातात दहा ते बारा जण गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details