बीड: धारूर तालुक्यातील कासारी येथे एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने (girl dead body found in well) एकच खळबळ उडाली होती. याच घटनेने कलाटणी घेतली आहे. प्रेम प्रकरण उघड होऊ नये (sister in law killing in love affair) यासाठी प्रियकराच्या मदतीने मामाच्या मुलीला विहिरीत ढकलून (Girl pushed sister in law into well) तिला जीवे मारले. या प्रकरणी मयत मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून प्रेमीयुगुलावर दिंद्रुड ठाण्यात खुनाचा पुन्हा नोंद झाला आहे. Latest news from Beed, Beed crime,
दोघीही बहिणी शेतात गेल्या :रमेश सोपान कदम रा. कासारी यांच्या फिर्यादीवरून त्यांचे बंधू ज्ञानोबा सोपान कदम हे पत्नी समवेत ऊस तोडणीसाठी कर्नाटकात गेलेले आहेत. त्यांची मुलगी साक्षी (वय 16) ही अकरावीत शिक्षण घेत असून गावी आजी-आजोबा सोबत राहते रमेश कदम यांची भाची वैष्णवी मनोहर काळे यात्रेनिमित्त आजोळी कासार येथे आली होती. रमेश कदम यांनी भाची वैष्णवी काळे व पुतणी साक्षी कदम यांना नवे कपडे घेतले व 25 नोव्हेंबरला दोघेही कपडे शिवण्यासाठी टेलरकडे गेल्या. त्यानंतर मामेबहीण साक्षी कदम आणि वैष्णवी काळे या शेतात गेल्या.