महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचाकडून मुलीची छेड; जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांनाही मारहाण - राष्ट्रवादी

पीडित मुलगी शेतात दिवसभर शेळ्या चारून सायंकाळच्या सुमारास घरी घेऊन जात होती. त्यावेळी सरपंच चोरमले यांनी तिला रस्त्यात गाठून 'तू मला फार आवडतेस' असे म्हणत तिची छेड काढली.

गेवराई पोलीस ठाणे

By

Published : Jun 5, 2019, 11:39 AM IST

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात वंजारवाडी गावात राष्ट्रवादीच्या सरपंचाने मुलीची छेड काढल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर मुलीची छेड का काढली? असा जाब विचारणाऱ्या वडिलांनाही सरपंचाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात सरपंचासह तिघांवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई पोलीस ठाणे

रवि भगवान चोरमले (सरपंच), अनिल भगवान चोरमले, बंन्सी पवार आणि उद्धव ढेंगे, अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी शेतात दिवसभर शेळ्या चारून सायंकाळच्या सुमारास घरी घेऊन जात होती. त्यावेळी सरपंच चोरमले यांनी तिला रस्त्यात गाठून 'तू मला फार आवडतेस' असे म्हणत तिची छेड काढली. पीडितेने घडलेली घटना तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडील माझ्या मुलीची छेड का काढली? असा जाब विचारण्यासाठी आरोपी सरपंच चोरमलेच्या घरी गेले. मात्र, त्यांनी पीडितेच्या वडिलांनाही लाथा-बुक्क्यांनी माराहण केली. याच दरम्यान पीडितेची आई वडिलांना वाचवण्यासाठी गेली असता तिलाही डाव्या हातावर काठीने मारहाण करीत हात धरला, असल्याचे आरोप पीडितेने केले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details